Video – गडचिरोलीत विषारू दारू प्यायल्याने 2 जणांचा मृत्यू, 8 जणांची प्रकृती अत्यवस्थ

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे विषारी दारू प्यायल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण अत्यवस्थ झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्रकाश फकिरा गौरकार (53) रा.लक्ष्मणपूर , रमेश नानाजी ढूमने (52) रा. लक्ष्मणपूर  अशी मृतांची नावे आहेत. गावातील 8 जण अत्यवस्थ असून त्यांना आष्टी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामध्ये बालाजी नारायण डवले, श्यामराव काशिनाथ गौरकार, राजू काशीनाथ गौरकार, गंगाधर नानाजी देव्हारे,बापूजी गोविंदा नांदेकर सर्व रा. लक्ष्मणपूर अशी अत्यवस्थ रुग्णाची नावे आहेत.

बुधवारी लक्ष्मणपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होते. त्या पार्श्वभूमीवर काहींनी ही दारू प्यायल्याचे सांगण्यात येत आहे. त्या सर्वांना सायंकाळी अत्यवस्थ वाटू लागल्याने आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी विषारी दारूची मोठया प्रमाणात अवैधरीत्या विक्री केली जाते. ऐन मतदानाच्या दिवशी अशी घटना घडल्याने विविध तर्काना उधाण आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या