गडचिरोलीत खासगी बस आगीत जळून खाक

743

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंजमधल्या कमलानगर परिसरात एका खासगी बसला आग लागली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती. सकाळचा नमाज आटोपून बाहेर पडलेल्या मुस्लिम बांधवाना ही आग दिसली. त्यांनी ही आग विझवण्याचे त्यांच्या परीने प्रयत्न केले. ही घटना बघणाऱ्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळविले. ज्यानंतर पोलीस ठाण्यातील सीआरपीएफच्या 191 ची तुकडी घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दलाच्या गाड्याही काही वेळात घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे कळते आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या