नक्षलविरोधी अभियानात पोलिसांना मोठं यश, चकमकीत 5 नक्षलवादी ठार

प्रातिनिधिक फोटो

गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात पोलिसांच्या नक्षलविरोधी C-60 पथकाने तीन दिवसांपासून राबविलेल्या अभियानाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत 5 नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. यात 3 पुरुष 2 महिला नक्षल्यांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणले जात आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक(अभियान) मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविले गेले.

चकमक संपल्यावर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदीन साहित्य ताब्यात आल्याची माहिती आहे. काडतुसे, मॅगझीन, 3 प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब, सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल आदीचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या