गडचिरोलीत मोठा नक्षली साहित्य जप्त

548

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताच्या इराद्याने लपवून ठेवलेला नक्षलवाद्यांचा साहित्य साठा गडचिरोली पोलीस दलाच्या हाती लागला आहे. पोलिसांनी नक्षल्यांचा मोठा कट उधळून लावला आहे.

पेंढरी जंगल परिसरात नक्षल्यांनी साहित्य लपवून ठेवले होते. सी – ६० जवानांच्या पथकाने शोधमामेहिमेदरम्यान हे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि दैनंदिन वापराचे साहित्य आहेत. पोलिस दलाच्या वतीने जंगल परिसरात शोधमोहिम तीव्र करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या