गडचिरोली पोलिसांनी केली जहाल नक्षलवादी दाम्पत्यास अटक

565

गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानास आज मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली पोलीस दलाने जहाल वरिष्ठ नक्षलवादी व टिपागढ दलमचा डीव्हीसीएम यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा (35) यास व त्याची पत्नी व जहाल नक्षलवादी टिपागढ दलम सदस्य शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम (३२) यांना आज अटक करण्यात आली आहे.

जहाल नक्षली बोगा हा सॅन २००९ मध्ये टिपागढ दलममध्ये भरती होऊन नक्षलमध्ये सामील झाला होता. सध्या तो टिपागढ दलमच्या डीव्हीसीएम या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर गडचिरोली पोलीस स्टेशनला 78 गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. यामध्ये 6 पोलिसांसह 18 खून तर 10 जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. हत्तीगोटा , मारकेगाव येथे जाळपोळ तसेच 1 मे 2019 रोजी जांभुळखेडा येथे घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात त्याचा मुख्य सहभाग होता. त्याचबरोबर एकूण 35 पोलीस नक्षल चकमकीत त्याचा सहभाग होता. शासनाने त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर त्याची पत्नी शारदा नैताम हिच्यावर गडचिरोली पोलीस दलाच्या विविध स्टेशनला एकूण 47 गंभीर गुन्ह्यांची नोंद असून शासनाने तिच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षल विभागाचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या