स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी गडचिरोली पोलिसांचा ‘प्रयास’

357

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, त्यांच्यातील बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, यासाठी गडचिरोली पोलीस विभाग अनोखा उपक्रम राबवत आहे. प्रयास (police reaching out youth and students) नावाच्या उपक्रमांतर्गत दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आश्रमशाळात सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली जाते. या शाळांतील शिक्षकांना व्हाट्सऍपद्वारे रोज दहा प्रश्न पाठवले जातात आणि हे प्रश्न अभ्यासाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सांगितले जाऊन उत्तरं मिळवली जातात. यामुळं विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडते आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ते तयार होतात, अशी अपेक्षा आहे. यात सर्वाधिक उत्तरं देणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसेही दिली जातात. या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या