मुंबईतील दोन जणांचा गाढेश्वर नदीत बुडून मृत्यू

8

सामना प्रतिनिधी । पनवेल

पनवेल तालुक्यातील गाढेश्वर नदीत मुंबईतील दोन जणांचा बुडून मृत्या झाल्याची घटना घडली आहे. किशोर मोतीराम चामुर (५०) आणि दीपक मोहन खडू (१२) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही मुंबईतील खार येथील रहिवासी होते.

किशोर चामुर यांच्यासह चौघे जण गाढेश्वर धरण परिसरात असलेल्या नातेवाईकाच्या फार्महाउसमध्ये गेले होते. त्यापैकी दीपक खडू हा १२ वर्षीय मुलगा गाढी नदीतील पाण्यात उतरला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. हे पाहताच किशोर मोतीराम चामुर यांनी दीपकला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. दरम्यान दिपकने किशोर यांना पाण्यात घट्ट मिठी मारल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या