सेवेचं फळ मिळालं, जिथं 40 वर्ष सफाई कर्मचारी म्हणून काम केलं तिथंच निवडणूक जिंकली

ज्या ग्रामपंचायतीत 40 वर्षांहून अधिक वेळ सफाई कर्मचारी म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीत आता सदस्य म्हणून जाण्याचा मान द्रौपदी रामचंद्र सोनूले या 71 वर्षीय आजींना मिळाला आहे. त्यांची सेवेप्रती कटिबद्धता विचारात घेऊन ग्रामस्थांनी त्यांना निवडणुकीत उभे केले आणि आज त्यांच्यावर विजयाचा गुलाल उधळला.

गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील द्रौपदी रामचंद्र सोनूले या महिना 60 रूपये पगारापासून गेली 46 वर्षांहून अधिक काळ विनातक्रार गावात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेचे‌ फळ म्हणून गावकऱ्यांनीच मतांच्या रूपाने अशी परतफेड केली आहे. विशेष म्हणजे द्रौपदी सोनूले यांनी गावातीलच माजी सरपंचांच्या पत्नीचा पराभव केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या