राष्ट्रीय रायफल्सची सूत्रे कर्नल गगनदीप यांच्याकडे

697

काश्मीर खोऱ्यातील हंदवारात आपल्या प्राणांची आहुती देत दहशतवाद्यांना संपवणारे आणि 11 नागरिकांचे प्राण वाचवणारे 21 राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख कर्नल आशुतोष शर्मा यांची जागा आता कर्नल गगनदीप सिंह घेणार आहेत. राष्ट्रीय रायफलचे नवे कमांडिंग ऑफिसर म्हणून मंगळवारी लष्कराने गगनदीप यांची नियुक्ती केली आहे. शनिवारी दहशतवाद्यांचा खात्मा करून कर्नल आशुतोष ,मेजर अनुज सूद या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय रायफल्सच्या ४ जवानांनी हौतात्म्य पत्करले होते.

1990 च्या दशकात कासमोर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी 21 राष्ट्रीय रायफल्सची स्थापना हिंदुस्थानी लष्कराने केली होती. या ब्रिगेडने आपल्या अतुलनीय पराक्रमाने आतापर्यंत कश्मीर खोऱ्यात 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशा पराक्रमी पथकाचे नाव शहीद कर्नल आशुतोष  यांनी आपल्या पराक्रमाने देशभरातच नव्हे तर जगात मोठे केले आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या काश्मिरी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी कर्नल आशुतोष यांनी स्वतः शनिवारच्या एन्काउंटरचे नेतृत्व केले.त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करीत ओलीस नागरिकांची सुटका केली .पण अखेर स्वतःच्या प्राणाची आहुती त्यांना द्यावी लागली.पराक्रमी आणि जांबाज अधिकाऱ्यांची ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय  रायफल्सच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा गगनदीप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गगनदीप यांनी याआधी या ब्रिगेडचे प्रमुखपद सांभाळले होते.पण लष्करी मुख्यालयातील जबाबदारीचे पॅड सांभाळण्यासाठी त्याची दिल्ली मुख्यालयात बदली झाली होती. आता त्यांना कश्मीर खोऱ्यात हंदवारा ,कुपवारा भागातील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पुन्हा 21 राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6 अशोक चक्र ,1500 सेना  मेडल्स मिळवणारे पराक्रमी पथक
हिंदुस्थानी लष्करात अतुलनीय पराक्रम साकारणारे पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 21 राष्ट्रीय रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी आपल्या शौर्याने 6 अशोक चक्र आणि 1500 सेना मेडल्स ब्रिगेडच्या भात्यात रोवली आहेत. हंदवारा चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मा यांनी लष्करात प्रवेश मिळविण्यासाठी 12 वेळ अपयश स्वीकारले होते .पण लष्करी वर्दीच्या प्रमाणे त्यांनी अखेर लष्करात प्रवेश मिळवला.दहशतवाद्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नल आशुतोष यांनी लष्करी गणवेशातच अतुलनीय पराक्रम गाजवत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

आपली प्रतिक्रिया द्या