संत गजानन महाराज संस्थानकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

678

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान समाजाला दिशा देणारे देशातील एक देवस्थान आहे. या संस्थानाकडून काही दिवसांपूर्वी अपघात झालेल्या वारकरी कुटुंबीयांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या कुटुंबीयांना संस्थानाकडून तीन लाखांचा धनादेश देण्यात आला.

अकोट तालुक्यातील पळसोद येथील वारकरी श्याम गोपाल तिव्हाने व विशाल संजय पाटेकर यांचा शेगाव मार्गावर टिप्परने धडक दिल्यामुळे 14 फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता संत गजानन महाराज संस्थानने दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी तीन लाखांचे धनादेश दिले. आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते धनादेश कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी त्या कुटुंबाला मदत देणार्‍या शेगाव संस्थानचे आभार मानले. विदर्भाची पंढरी व संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापन, वारकर्‍यांना सुविधा, त्यांचा सन्मान, उत्कृष्ट व्यवस्था व धर्म जागरणासोबतच समाजहिताचे कार्य करते. संस्थानचे कार्य आदर्श जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या