स्वस्तात मस्त ना भावा! सॅमसंगचा बहुचर्चित ‘Galaxy M02s’ स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त…

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 हजारांच्या आत असेल तर तुमच्यासाठी सॅमसंग कंपनीने एक खास ‘स्वस्तात मस्त’ फोन आणला आहे. दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या सॅमसंगने हिंदुस्थानमध्ये आपला बहुचर्चित ‘Galaxy M02s’ हा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे ‘Galaxy’ सिरिजमधील 10 हजारांच्या आत किंमत असणारा सॅमसंग कंपनीचा हा पहिला फोन आहे.

दरम्यान, हा फोन दोन व्हेरिएन्टमध्ये देण्यात आला आहे. एकात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, तर दुसऱ्यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. काळा, निळा आणि लाल रंगात हा फोन उपलब्ध आहे.

galaxy-m02s-camera-2

वैशिष्ट्य –

– 6.5 इंचाचा एचडी प्लस Infinity V डिस्प्ले
– Qualcomm Snapdragon 450 प्रोसेसर
– Android 10 बेस्ड OneUI

कॅमेरा –

‘Galaxy M02s’ फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे, तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रॅट कॅमेरा देण्यात आलाय.

galaxy-m02s-camera

बॅटरी –

‘Galaxy M02s’ मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 4G, USB Type C, Bluetooth, GPS सह 3.5mm हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. मात्र फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले नाही.

galaxy-m02s

किंमत –

3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 8,999 रुपये आहे, तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 9,999 रुपये एवढी आहे. हा फोन तुम्ही सॅमसंग स्टोअर किंवा अमेझॉनवरही खरेदी करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या