बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल बेपत्ता

130

सामना ऑनलाईन । जळगाव

धाडस दाखवून एका मुलाला वाचवणारा बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल हा मुलगा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी त्याच्या आईने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे निलेशचा धाकटा भाऊही बेपत्ता आहे. निलेश रेवाराम भिल आणि त्याचा धाकटा भाऊ गणपत भिल हे दोघेही १७ मे पासून बेपत्ता आहेत. निलेशचं वय १२ वर्षं असून त्याचा भाऊ ७ वर्षांचा आहे.

२०१४ मध्ये मुक्ताई मंदिरासमोर तयार केलेल्या घाटात भागवत घोगले हा मुलगा पाय घसरून पडला. त्यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या निलेशने प्रसंगावधान दाखवत पाण्यात उडी मारून त्याचा जीव वाचवला. या शौर्यासाठी निलेशला २६ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या