पुण्यात दत्तवाडीतील जूगार अड्ड्यावर छापा; 15 जणांवर गुन्हा दाखल

दत्तवाडी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जूगार, मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तवाडी परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जूगार, मटका सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. यानूसार पथकाने सापळा रचून जूगार खेळणार्‍या आणि खेळवून घेणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून जूगाराचे साहित्य, मोबाईल असा 66 हजार 505 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार अजय राणे, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.