पॉर्न व्हिडीओ प्रकरणी अटक केलेल्या अभिनेत्रीची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

पॉर्न व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक करण्यात आली आहे. गहनाची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गहना वशिष्टला अटक करण्यात आले असून तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिची तब्येत बिघडल्याने तुरुंगाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गहनाला मधुमेहाचा आजार आहे. गेल्या काही दिवसांत तिच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गहनाला घरच्या डब्याची परवानगीही नाही.

तुरुंगात गहनाची तब्येत सातत्याने खालावत असल्याने तिला तुरुंगातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात गहनला हलक्या स्वरुपाचे कार्डियेक अरेस्ट आले होते. तसेच गहनला अस्थमाचा अजार असून तिची प्रकृती गंभीर आहे.

गहनाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 2019  मध्ये ती व्हेंटिलेटरवर होती. गहना तेव्हा अगदी मृत्यूच्या उंबरठ्यावर होती पण तिला वाचवण्यात यश आले. तेव्हा तिच्या शरीराती शुगरचे प्रमाण 500  इतके होते. जेव्हा तिला अटक केली तेव्हा 600 इतके होते. गहनला जो मधुमेहाचा अजार आहे त्यात 98 टक्के रुग्णांचे प्राण जातात असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींना पॉर्न व्हिडीओत काम करण्यासाठी भाग पाडल्या प्रकरणी तसेच पॉर्न व्हिडीओ शूट केल्या प्रकरणी गहनाला पोलिसांनी अटक केली होती. गहनाने मिस एशिया बिकनी किताब मिळवला होता. अभिनेत्री, मॉडेल गहना वशिष्ट सध्या पॉर्न व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आली होती आहे. गहना वशिष्ट या अभिनेत्रीने हिंदी, तेलगु चित्रपटांमध्ये काम केले आहे. पोलिसांना मालाड-मालवणी या परिसरात पॉर्न व्हिडीओ बनवले जात असल्याची माहिती मिळाली होती.

हे ही वाचा –

पॉर्न व्हिडीओ प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

अभिनेत्रीवर बलात्काराचा गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण? 

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री आयसीयूमध्ये, 48 तासांपासून करत होती शूटींग

आपली प्रतिक्रिया द्या