1 सप्टेंबरपासून मुंबई ते चिपी विमानसेवा, मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचे विघ्न कायमच

चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार आहे. कारण सिंधुदुर्गातील चिपी ते मुंबई विमानसेवा येत्या 1 सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. एअर अलायन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांमार्फत ही विमान सेवा सुरू होईल. मात्र दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱdया चाकरमान्यांसमोर खड्डय़ांचे विघ्न कायम असणार आहे.

चिपी विमानतळावरून विमान प्रवास सेवा सुरू झाली होती, पण कालातरांने ही विमानसेवा बेभरवशाची झाली. विमानसेवा संपूर्णपणे अनियमित झाल्यामुळे कोकणवासीय व पर्यटकांनी या विमानसेवेकडे पाठ फिरवली होती.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री व सिंधुदुर्ग जिndह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे याची आज नवी दिल्लीत भेट घेतली. 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरळीत सुरू करण्याची विनंती यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांना करण्यात आली. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्र्यांनी दिले.

विमानसेवेच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाकडून आवश्यक त्या बाबी चार दिवसात पूर्ण करून घेतल्या जातील, अशी ग्वाही आयआरबी कंपनी व एअरपोर्ट संचालक किरण कुमार यांनी दिली. या बैठकीला केंद्रीय मंत्रालयाचे सचिव, विशेष कार्य अधिकारी, संयुक्त सचिव, एअर इंडिगो, एअर इंडिया, एअर अलास्का आयआरबीचे किरण कुमार उपस्थित होते.

महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य

मुंबई-गोवा महामार्गवर सध्या अनेक ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य आहे. इंदापूर, माणगावमध्ये तर प्रचंड वाहतूककोंडी अजूनही होते. खेड, चिपळूणमध्ये तर रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील सिंगल लेन सुरू करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.