मोरया… मोरया… यंदा ‘बाहुबली-२’ रुपात अवतरणार गणपती

सामना ऑनलाईन । मुंबई

गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत. बाप्पाच्या आगमनाची सारेच वाट पाहाता असतात आणि दरवर्षी नवनवीन रुपात बाप्पा मखरात विराजमान होतात. भगवान गणेशाची आराधना विविध रुपात केली जाते. प्रत्येक वर्षी जे ऐतिहासिक, पौराणिक किंवा काल्पनिक चरित्र प्रसिद्ध ठरले त्या रुपात बाप्पा पाहायला मिळात. यंदा सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘बाहुबली-२’च्या रुपात बाप्पा पाहायाला मिळणार आहे. या आधी शिवलिंग हातात घेतलेल्या महेंद्र बाहुबलीच्या रुपात बाप्पा पाहायला मिळाले होते. तर यंदा अमरेंद्र बाहुबलीच्या रुपात बाप्पा दिसतील.

baahubali2-ganapathi

‘त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:। त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।’ असं म्हणत आपण आपल्या बाप्पाची स्तुती करतो तो, हा बाप्पाच आपल्यावर आलेली संकट दूर करतो, त्यामुळे बाप्पाला ‘बाहुबली-२’ रुपात घेऊन येण्याची तयारी अनेक मंडळांनी केल्याचे समजते. त्यासाठी जूनमध्येच मूर्तीकारांना तशी मूर्ती बनवण्यास विनंती केल्याचे कळते. सध्या व्हॉट्स अॅपवर एक मूर्ती तयार होत असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत गणपती बाप्पा अमरेंद्र बाहुबलीच्या रुपात दाखवण्यात आले आहे. ते हत्तीच्या सोंडेवर उभे आहेत आणि त्यांच्यामागे माहेश्मती नगरीतील भव्य राजवाडाही दिसतो आहे. त्यामुळे यंदा गणरायाच्या ‘बाहुबली-२’ मूर्ती अधिक दिसतील अशी चर्चा आहे.

ganpathi-baahubali

आपली प्रतिक्रिया द्या