बॉलिवूड आणि टॉलिवूड येणार एकत्र, साकारणार ‘पसायदान’

2567

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | नगर

चित्रपट हा समाजाचा आरसा समजला जातो. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटले तसेच चित्रपटांचाही प्रभाव समाज मनावर होत असतो. पूर्वीच्या काळी चित्रपटांद्वारे सामाजिक प्रबोध करण्याचे काम करण्यात येत होते, मात्र मधल्या काळात फक्त मनोरंजनाच्या नावाखाली नकोनको त्या गोष्टी त्यामध्ये घुसवण्याचे काम केले गेले आणि चित्रपटाचा टेंपो बदलला. पण आता हा भटकलेला टेंपो रस्त्यावर आणण्याचे काम काही तरुण मंडळी करताना दिसत आहेत. मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील पडद्यावरील आणि पडद्यामागील एकत्र आणत जगाला एक चांगला संदेश देणारा ‘पसायदान’ हा चित्रपट तयार करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

जगभरात आज आपण पाहतो की सर्वत्र अराजकता माजली आहे. शेजारी शेजाऱ्याची, भाऊ भावाशी, गावं गावाशी, राज्य राज्याशी, राष्ट्र राष्ट्रामध्ये भाडणं होऊन अशांतता वाढली आणि मात्र जगाला शांतीचा संदेश देण्याचे काम काही मंडळी करताना दिसत आहेत. जगभरात चित्रपट हे माध्यम त्यासाठी वापरले तर अधिक उत्तम असेल असे तरुणांच्या डोक्यात आले. कारण चित्रपटाला भाषेची आवश्यकता नसते. संवाद हे फक्त माध्यम आहे, बोलपट येण्याआधी मुक चित्रपटाद्वारेही समाजप्रबोधन केले जाते होते. असाच एक प्रयत्न करत आहे एक मराठी मुलगा आहे, बाळकृष्ण सूर्वे, दीपक भावे आणि त्यांची टीम. मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील लोकांना एकत्र आणत जगाला एक चांगला संदेश देणारा ‘पसायदान’ हा चित्रपट तयार करण्याचे त्यांनी ठरवले आहे. चला तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ‘पसायदान’ या चित्रपटाबाबत…

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ‘पसायदान’ यावर चित्रपट तयार करावा हे कधीपासून डोक्यात होते आणि असे का वाटले याबाबत विचारले असता बाळकृष्ण म्हणाला की, दीपक आणि मी आम्ही दोघे एकाच शाळेतील आहोत ते म्हणजे साधना विद्यालय. या शाळेमध्ये शिकत असताना आणि त्यानंतरही पसायदान ऐकू यायचं. त्याच वेळी आम्ही ठरवलं की यावर पुढे जाऊन काही तरी करायचं. आम्हाला दोघांनाही आपल्या देशासाठी आणि मातीसाठी काहीतरी करण्याची उर्मी लहानपणापासून होती.

dnyaneswar0

दीपक म्हणजे पसायदानच्या दिग्दर्शकाबाबत सांगायचं झालं तर शाळेनंतर त्यानं अधांतर नाटक केलं. त्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्यासोबत त्याने काम केलं आहे. मधूर सरांच्या चित्रपटासाठी त्याने फर्स्ट असिस्टंट डायरेक्टर या पदावर काम केलं आहे. पण त्यानंतर आम्हाला वाटले की आपणही काहीतरी करावे. पसायदान ही संकल्पना त्यावेळी डोक्यातही होती. त्यावेळी अण्णा म्हणजे साऊथकडील गुणशेखर जे पसायदान या चित्रपटासाठी प्रोडक्शन हेड म्हणून काम पाहत आहेत त्याच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर चित्रपट क्षेत्रातील मोठे संगीतकार इलयराजा यांच्यासोबत पसायदान संदर्भात चर्चा केली. त्यांना अतिशय आनंद झाला की यावर चित्रपट निर्माण केला जात आहे. त्यानंतर आम्ही स्क्रिनप्ले लिहिला ते देखील आळंदी याठिकाणीच.

ज्ञानेश्वरांना तब्बल ८०० वर्षापूर्वी पसादान लिहिले. त्यांच्या ज्ञानेश्वरी या भावर्थातील शेवटच्या ९ ओळी म्हणजे पसायदान. हिंदुस्थानातील एक १८ ते १८ वर्षाचा मुलगा संपूर्ण जगासाठी पसायदान मागतो हिच संकल्पना घेऊन आम्ही पुढे जाण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील आणि देशातील काही लोकांना पसायदान माहिती आहे. मात्र आज कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या मुलाला हे माहिती नाही. त्याचमुळे संपूर्ण जगाला याचे सार वाटण्यासाठी पसायदान यावर चित्रपट तयार करण्याचे ठरवल्याचे बालकृष्ण याने सांगितले.

चित्रपटाविषयी आणखी विचारले असता तो म्हणाला की, या चित्रपटाचे भाषांतर विविध भाषांमध्ये होणार आहे. चित्रपटामध्ये फक्त एकच गाणे असून त्याचे तब्बल ३६ भाषांमध्ये रुपांतर होणार आहे. अवघे विश्वची माझे घर असे म्हणत आम्ही हिंदुस्थानचे वैभव पसायदान जगाला देण्यासाठी जात आहोत. पसायदान या नावावरून हा चित्रपट अध्यात्मिक आहे असे वाटत असले पण हा तुमचा गैरसमज आहे. हा चित्रपट एक संपूर्ण मसाला चित्रपट असेल असे बाळकृष्ण याने सांगितले. तसेच या चित्रपटासाठी आम्ही रंजीत सर आणि मामूट्टी सर यांचीही भेट घेतली होती असेही तो म्हणाला.

ilayraja

चित्रपटाचा दिग्दर्शक दीपक भावे यांनी सांगितले की, जगभरात अराजकता माजताना दिसत आहेत. मात्र जगाताली अशांतता नष्ट करण्याचे तंत्र हिंदुस्थानातील एका लहान मुलाने कित्येक वर्षापूर्वी सांगितले आहे. आज अनेक देशांमध्ये लहान मुलं शांळेत बंदूक घेऊन पोहचलेली दिसतात. जगात शांतता नांदावी यासाठी भाषा हे माध्यम मोडून काढत त्यांना एकत्र आणायला हवे. बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील फरक विचरला असता ते म्हणाले की, टॉलिवूड हे आज बॉलिवूडच्या पुढे आहे. याचाच फायदा करून घ्यायचा आहे. पसायदान हा आपल्या मराठी मातीमधील विचार आहे मात्र या चित्रपटासाठी टेक्निकल क्रू हा दक्षिणेकडील असणार आहे. हा चित्रपट एक चळवळ आहे, असेही दीपक म्हणाला. तसेस मराठी विचार दक्षिणेच्या कॅमेऱ्यातून मांडण्यात येणार आहे. कारण या चित्रपटासाठी काला या रजनीकांत सरांच्या चित्रपटासाठी कॅमेरामॅन म्हणून काम केलेला मुरली हा डीओपी म्हणून काम करणार आहे.

चित्रपटामध्ये कोणती स्टारकास्ट असेल आणि कधीपर्यंत तयार होईल असे विचारले असता ते म्हणाले की, इलयराजा यांना सायनिंग अमाउंट देऊन फायनल केले आहे. तसेच मराठी कलाकार अमोल पालेकर या चित्रपटामध्ये असणार आहे. मामूट्टी सरांसोबत चर्चा सुरू असून लवकरच त्यांचाही होकार मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच या चित्रपटाचा स्क्रिनप्ले आपण स्वत:च लिहिला असून चित्रपटाचा सेट चेन्नईमध्ये उभारण्यात येईल, असेही दिपक म्हणाला. मुरली हा कॅमेरामॅन असेल. त्याने काला, मद्रास आणि कबाली या चित्रपटासाठी डीओपी म्हणून काम केले आहे. पसायदानमधील गाणे हे ३६ भाषांमध्ये असेल व त्याची सुरुवात लॅटिन भाषेपासून होईल. यासाठी प्रा. विजय तापस हे लिरिक्सचे काम करत आहे. अमेरिकेमधील बृहन्महराष्ट्र मंडळाचे अविनाश पाध्ये हे तेथील जबाबदारी सांभळत असल्याचेही दीपकने सांगितले.

pasaydan

चित्रपटाचे प्रोडक्शन हेड गुणशेखर यांनी सांगितले की, बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील महत्त्वाचा फरक म्हणजे तेथे रिस्क घेतली जाते. त्यांना त्यांच्या स्क्रिप्टवर कॉन्फिडन्स असतो आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन आम्ही पुढे जात आहोत. चित्रपट मांडण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे, बॉलिवूडप्रमाणे काटकसर तेथे केली जात नाही. तसेच दीपक आणि बाळाला कधीपासून ओळखता याबाबत ते म्हणाले की, आमची ८ ते ९ वर्षापूर्वीची ओळख आहे. मी काला या चित्रपटासाठी मुंबईसाठी प्रोडक्शनचे काम पाहिले आहे, असेही गुणशेखर यांनी सांगितले. धारावीमध्ये रजनीसर, कबालीचे डायरेक्टर आणि अभिनेता धनूष शूटसाठी येत होते तेव्हा त्यांची सर्व जबाबदारी माझ्याकडे होती, असे गुणशेखर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या