विसर्जनावर ड्रोनचा वॉच

130

सामना प्रतिनिधी । मुंबई

विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून यावेळी उसळणाऱया गर्दीवर ड्रोन कॅमेऱयातून नजर ठेवण्यात येणार आहे. विसर्जन ठिकाणे आणि प्रमुख गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांची ड्रोन कॅमेऱयातून नजर असेल. पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या असून सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल अशी माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्या रश्मी करंदीकर यांनी दिली.

तगडा बंदोबस्त

 • मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यांतील पोलीस ऑनडय़ुटी.
 • सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक पथक, क्यूआरटी, एसआरपीएफच्या १२ कंपनी.
 • होमगार्ड, आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाइड यांची मदत.
 • मुंबईत ठिकठिकाणी १३४ वॉच टॉवर्स.
 • स्वयंसेवी संस्थांचे सुमारे आठ हजार प्रतिनिधी.
 • पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱयातून नजर.
 • महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशात गस्त.
 • लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था.
 • कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सोशल मीडियावरही विशेष वॉच.
 • समुद्रकिनाऱयांवर पोलिसांची बोटीतून गस्त.

येथे संपर्क करा

 • संशयास्पद वस्तू, व्यक्ती आढळल्यास किंवा इतर काही समस्या असल्यास १०० नंबरवर कॉल करा.
 • स्थानिक पोलीस ठाणे किंवा 7738133133, 7738144144 या नंबरवर एसएमएसमधून संपर्क करा.
 • नागरिक ट्विटरूनही पोलिसांशी संपर्क साधू शकतात.
 • विसर्जन स्थळांवर पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने आपत्कालीन मदत कक्ष बांधण्यात आले आहेत.

हे अवश्य करा

 • गर्दीमध्ये लहान मुले आणि स्त्रीयांची काळजी घ्या.
 • लहान मुलांचे हात सोडू नका.
 • स्त्रीयांनी मौल्यवान दागिने घालणे टाळावे.
 • पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
 • संशयास्पद हालचाली आणि व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी अलर्ट राहा.
 • अनोळखी व्यक्तीने दिलेले काहीही खाऊ नका.
आपली प्रतिक्रिया द्या