आरत्या म्हणा, निरोगी रहा! रक्तदाब, केसगळती, डोळ्यांचे विकार यावर फायदेशीर

आनंद पिंपळकर

गणपती घरात आला की दिवसभरात त्याची दोनवेळा आरती केली जाते. त्यावेळी आपण जोरजोरात टाळ्या वाजवतो. आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात आपण टाळ्या वाजवतो खऱ्या, पण त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होतात हे कुणालाच ठाऊक नसते. वास्तविक या प्रकाराला ‘क्लॅपिंग थेरपी’ असं म्हणतात. काहीवेळा तर ही थेरपी मुद्दाम वापरण्याचा सल्लाच डॉक्टर देतात.

माणसाच्या शरीरात एकूण 340 प्रेशर पॉइंट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. त्या प्रेशर पॉइंटवर विशिष्ट दाब दिल्यास किंवा त्यांच्यावर मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होतात. ही क्लॅपिंग थेरपी करायची तर प्रथम खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यांसमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस जास्त फायद्याचा ठरतो. सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळ्या वाजवल्या तर फीट आणि अॅक्टिव्ह राहता येईल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात आरती जरा जोशात करा.

टाळीमुळे अॅक्युपंचरला चालना

हॅण्ड कॅली पॉइंट, बेस ऑफ थम्ब पॉइंट (अंगठय़ाच्या) खालचा भाग, रिस्ट पॉइंट (मनगट), इनर गेट पॉइंट, थंब नेल पॉइंट (अंगठय़ाचं नख) या पाच पॉइंट्सला चालना दिल्यास अनेक फायदे होतात.

  • हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.
  • गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.
  • क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते. सतत एसीमध्ये बसून काम करणाऱ्यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
  • क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. मधुमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.

 

आपली प्रतिक्रिया द्या