Ganeshotsav 2023 – चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 23 पथके तैनात

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. आरोग्य विषयक खबरदारी म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग चाकरमान्यांची तपासणी करत आहे. जिल्ह्यात 23 ठिकाणी आरोग्य विभागाची पथके तैनात आहेत. मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात येत असल्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत याची खबरदारी घेतली जात आहे.

आरोग्य विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर एसटी स्टॅण्ड आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर तपासणी पथके तैनात ठेवली आहेत. त्यामध्ये खेड येथे हॉटेल अनुसया, हॅप्पी ढाबा, भोस्तेघाट, भरणेनाका, खेड रेल्वेस्थानक. चिपळूण तालुक्यात सवतसडा पेढे, कळंबस्ते, बहादूरशेखनाका, अलोरे घाटमाथा, सावर्डे दहीवली फाटा, चिपळूण रेल्वेस्थानक. संगमेश्वरमध्ये आरवली, संगमेश्वर एसटी स्टॅण्ड, वांद्री, देवरुख – मुर्शी, संगमेश्वर रेल्वेस्थानक, रत्नागिरी तालुक्यात हातखंबा तिठा, पाली, रत्नागिरी रेल्वेस्थानक, लांजा तालुक्यात वेरळ, कुवे गणपती मंदिरसमोर, विलवडे रेल्वेस्थानक, राजापूर तालुक्यात राजापूर जकातनाका याठिकाणी पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.