Ganeshotsav 2024 गणपतीत झळकणार ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’; नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा नवा चित्रपट

shriyut non maharashtrian

 

मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे असं खरंतर बिंबवलं जातं. मात्र प्रत्यक्षात आता उद्योगविश्वातही मराठी मुलं आपलं नाव कोरताना दिसत आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोंच्या घरात अर्ज येतात हे समाजातील भयाण वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट गणपतीत (Ganeshotsav 2024) प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे.

उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि.  निर्मित ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटात जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक आहेत. त्यांच्या कॅफे च्या शाखा विस्तारण्यासाठी ते एका  गुंतवणूकदाराच्या शोधत असतात. जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी  एक पैलू दडलेला आहे, तो  रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे.  त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे. तर कोण आहे ए. के ? जनक त्याला का शोधतोय? आणि त्यांचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले, आम्ही मराठी माणसांसाठी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी माणसे दिवाळी, ख्रिसमस अशा वेळेस हिंदी किंवा अन्य चित्रपट बघत असतात. यंदा आम्ही खास मराठी प्रेक्षकांसाठी गणेशोत्सवात माराठी चित्रपट घेऊन येत आहोत. मराठी माणसांनी मराठी सण – उत्सवाला माराठी चित्रपट पहावेत असे आवाहनही त्यांनी केले.  त्याचप्रमाणे श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन ह्या चित्रपटाला सोशल मीडिया वर उदंड प्रतिसाद मिळतोय. ट्रेलर युट्युब प्रदर्शित झाल्या पासून 4 लाख वियुज मध्ये 9 हजार लाईक्स आलेल आहेत. युट्युब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर खूप कौतुक केलं जात आहे. तसेच शत्रूची हार निश्चित कर हे गाणं लाँच झाल्यावर आणखीन उत्सुकता वाढली आहे.