गणेशोत्सव मंडळांना पालिकेची आचारसंहिता, उत्सवासाठी 4 फुटांपेक्षा मोठी मूर्ती नाही

411
hounslow-ganeshotsav-mandal

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नुकतेच सिंगल विंडो सिस्टिम सुरु करीत मोठा दिलासा दिला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करताना मंडळांना एक विशेष आचारसंहिता महापालिकेने लावली असून त्यानुसार मंडळांना एक हमीपत्रदेखील भरुन देणे अनिवार्य असणार आहे. ज्यात प्रामुख्याने यंदा गणेशमूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी, अशी मुख्य अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्सव काळात व्यावसायिक जाहिरातींना प्रतिबंध घालून साधेपणाने उत्सव साजरे करण्याचे आवाहन घालण्यात आले आहे.

मुंबईत दरवर्षी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा मात्र या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व उत्सव मंडळाचे लक्ष पालिकेच्या परवानगीकडे लागले होते. अखेर मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भातील सिंगल विंडो सिस्टिम सुरु केली असून गणेशोत्सव मंडळांना हमीपत्र भरुन देण्याची अट ठेवली आहे. या अटीनुसार आता उत्सव मंडळांवर एक आचारसंहिता आली असून यानुसार यंदा साधेपणाने उत्सव साजरा करण्याची अट ठेवण्यात आली आहे. ज्यात प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उत्सव मंडपाचा आकार देखील कमीतकमी ठेवण्याची सूचना करावी लागणार आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तर कार्यकर्त्यांना आणि भक्तांना मंडपात प्रवेश देताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय मंडपाच्या मुख्य भागांचे तीन वेळा निर्जंतुकीकरण करुन घेण्याबरोबरच मंडपात सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागणार आहे. मुख्य म्हणजे, उत्सव कालावधीत या नियमांचा भंग केल्यास किंवा कोरोनाचा किषाणूचा फैलाव होईल, असे कोणेतही कृत्य केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

काय आहे ही आचारसंहिता
– भक्तांना ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करणे, प्रत्यक्ष दर्शन आणि भेटीची परवानगी न देणे
– प्रसाद वाटणे, फूल आणि हार अर्पण करण्यास प्रतिबंध करणे
– मंडपाशेजारी इतर स्टॉलला परवानगी न देणे
– आरतीच्याळी फक्त दहा कार्यकर्त्यांनाच परवानगी देणे
– कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची जबाबदारी घेणे
– विसर्जन मंडपालगतच्या कृत्रिम तलावात करणे

यंदाचा उत्सव साजरा व्हावा याबाबत समिती सुरूवातीपासूनच आग्रही होती. तशी स्पष्ट भूमिका दीड महिन्यापूर्वीच जाहीर केली होती. समितीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने साधेपणाने उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकार आणि पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मंडळांनी पालिकेने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत त्यांना सहकार्य करायचे आहे. ऍड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

आपली प्रतिक्रिया द्या