घरफोडय़ा करणारा गजाआड, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

190

घरफोडय़ा करणाऱया सराईत आरोपीला अखेर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सलीम शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे आहेत. जुलै महिन्यात एमआयडीसी येथील एका दुकानात घरफोडी झाली होती. घरफोडीप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याचा तपास पोलीस करत होते, मात्र नेमका चोरटा कोण हे स्पष्ट होत नव्हते. तपासादरम्यान एक जण केरळ येथून सोने घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

वरिष्ठ निरीक्षक अनिल कोळी यांच्या पथकातील उपनिरीक्षक स्वप्नील भुजबळ आणि डिटेक्शन स्टाफने सापळा रचून सलीमला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीची पोलिसांना कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सलीमने दिल्ली, सुरत आणि केरळ येथे लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये अपंगांच्या डब्यात चोऱया केल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या