उत्तराखंडमध्ये 26 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार, 20 दिवसांनंतर गुन्हा दाखल

973
प्रातिनिधीक फोटो

उत्तराखंडमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर 5 नराधमांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी 20 दिवसांनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीची कामाच्या ठिकाणी अहबाब अली या तरुणाशी ओळख झाली. नंतर अहबाबने तरुणीला नोकरी सोडून आपल्यासोबत व्यवसायात भागीदारी होण्याची गळ घातली. तरुणीने त्याला होकार देत दोघेही देहरादून आणि ऋषीकेशमध्ये व्यावसायिक कारणासाठी गेले होते. या दरम्यान अहबाबबे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. एक महिन्यापूर्वी तरुणीने अहबाबला लग्नाबाबत विचारले. तेव्हा लॉकडाऊनमुळे आपला व्यवसाय बुडाल्याचे अहबाबने सांगितले. तसेच इतक्यात लग्न करता येणार नाही असेही सांगितले.

नंतर काही दिवसांनी अहबाबचा भाऊ परवेझ याने पीडित तरुणीकडे शारिरीक सुखाची मागणी केली. तसेच जर नाही म्हणालीस तर तिचे अहबाबसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. तेव्हा परवेझने तिच्यावर बलात्कार केला. नंतर 20 दिवसांनी परवेझने आपल्या तीन मित्रांसोबत हरिद्वारमध्ये पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

नंतर या प्रकरणी तरुणीने हिंम्मत दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या