दोन अल्पवयीन बहिणींवर सलग 6 दिवस 15 जणांचा सामूहिक बलात्कार, आरोपी अजूनही मोकाट

rape
प्रातिनिधिक फोटो

पाकिस्तानमध्ये दोन अल्पवयीन बहिणींवर 15 जणांनी सलग 6 दिवस सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित मुलींच्या आईने हा आरोप केला असून आरोपीने बलात्काराचा व्हिडीओ देखील काढला. मुलींचे वय 15 वर्ष आणि 17 वर्ष आहे. याबाबत geo.tv ने वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, पीडित मुलींचे 11 जणांनी अपहरण केले होते. या मुलींना फैसलाबाद परिसरात नेऊन त्यांच्यावर सलग 6 दिवस बलात्कार करण्यात आला. ही घटना समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र अद्यापही आरोपी मोकाट असल्याचे उघड झाले आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबरला दोन्ही बहिणीचे अपहरण झाले होते. अपहरण केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला. पीडित मुलींना नशेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. बलात्कार केल्यानंतर 15 वर्षीय मुलीला फैसलाबादच्या जंग बाजारात सोडून देण्यात आले. तर मोठ्या बहिणीला गुजरानवाला येथे सोडले.

आपली प्रतिक्रिया द्या