धाराशिव जिल्हा हादरला, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन मुलांविरुध्द गुन्हा दाखल

फोटो- प्रातिनिधिक

एका अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना 18 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे घडली. याबाबत आज मंगळवार, 20 ऑक्टोबर रोजी रात्री लोहारा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केला. मुलीवर बलात्कार झाल्याचे आई-वडिलांना 20 ऑक्टोबरला निदर्शनास आले. मुलीची प्रकृती बिघडल्याने सदर मुलीला वडिलांनी तातडीने उपचारासाठी स्पर्श ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल केले. मात्र पीडितेची प्रकृती गंभीर झाल्याने उपचारासाठी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपी मुलांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असुन पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादी वरुन तिन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलिस उपविभागीय आधिकारी अनुराधा गुरुव, प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक आर. एम. जगताप यांनी भेट दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या