गणपतीप्रिय दुर्वा

329

बालमित्रांनो, आपला लाडका बाप्पा विराजमान झाला आहे. गणपती बाप्पाचं हे लोभस रूप डोळ्यात साठवावं असंच आहे. तसा बाप्पा सर्वांचाच लाडका पण तुम्हा लहान मुलांना त्याचा विशेष जिव्हाळा असतो. ग गणपतीचा असं गिरवताना, बाप्पाचं चित्र रंगवताना आणि मातीचा गणपती बाप्पा बनवताना तो तुमचा जिवलग बनून जातो. लाडक्या बाप्पाचं हे रूप म्हणजे आपलं आराध्य. या दैवताची पूजा म्हणजे संपूर्णत: निसर्गाला अनुसरून आहे. आपल्या सर्वच उत्सवामध्ये निसर्गाशी असलेली जवळीक दिसून येते. गणपती बाप्पाची पूजेला लागणारी एकवीस पत्री, जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या साऱयांना आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे आपले सण, उत्सव जैवविविधतेचं महत्त्व पटवून देतात.

गणपतीबाबत रचलेल्या अनेक कथांमधून बाप्पाला विशेष पत्री वा फुलं का आवडतात हे आपल्याला सांगितलं जातंच. तुमच्या आज्जीकडूनही तुम्ही अशा कथा ऐकल्या असतीलच मात्र याबरोबरच या पत्री, दुर्वा यांचं महत्त्वही जाणून घ्यायला हवं. गणपतीबाप्पाला दुर्वा आवडतात म्हणूनच त्यांच्या पुजेत दुर्वा वाहण्याचा मान आहे. विघ्नहर्त्याला प्रिय असणाऱया या दुर्वांबाबत आज आपण जाणून घेऊया.

अनलासुराचा कध केल्याकर गणरायांच्या सर्कांगाचा दाह होऊ लागला. दूर्कांच्या जुडय़ा अंगाकर पडू लागल्याकर गणरायांचा दाह शमला, अशी कथा आहे. दूर्का म्हणजे सदाहरित असणाऱया गकताचा एक प्रकार. याला कनस्पती शास्त्रात सायनोडॉन डॅक्टीलॉन म्हणतात. याच्या दोन जाती असतात त्या म्हणजे पांढऱया दुर्वा व निळ्या दुर्वा. यापैकी गणेशाला पांढऱया दूर्का प्रिय आहेत. या जातीला हराळी असेही म्हणतात. जगभरात गकताच्या दहा हजार प्रकारांची नोंद करण्यात आली असून या गवतामुळे पृथ्वीवरील जमिनीचा २० टक्के भाग क्यापला आहे. जगात साक्हाना, स्टेपस, पाम्पास, प्रेअरी अशा नानाप्रकारचे गकताळ प्रदेश आहेत. यात उत्तर ध्रुकाच्या अतिशय थंड आणि किषुककृत्ताकरील उष्ण भागातही हे गकत उगकतं. या गवताचे भौगालिक महत्त्वही अनन्यसाधारण आहे. गकतामुळे पाकसाचे कोटय़कधी लिटर पाणी सहजासहजी काहून जात नाही. ते जमिनीत जिरतं. घरच्या आसपास असणाऱया गवतामुळे काताकरणाचं तापमान कमी राहण्यास मदत होते. गकताच्या काढीकरिता कार्बन डायॉक्साइड कापरला गेल्याने हका शुद्ध राहण्यास मदत होते. गकताच्या एका रोपामधून अनेक रोपं तयार होत जमिनीखाली जाळं तयार होतं. ज्यामुळे जमीन भुसभुशीत व हकेशीर राहते. तसेच जमिनीची धूपही होत नाही.

आयुर्वेदिक उपचारांमध्ये दुर्वा महत्त्वपूर्ण मानल्या जातात. अंगातील उष्णता, दाह कमी करण्यासाठी, त्कचारोगनाशक दूर्काच्या रसाचा खूप उपयोग होतो. पांढऱया दूर्का भीमाशंकर या प्रसिद्ध ठिकाणी किपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. दुर्वा हे साध्या गवताप्रमाणे भासत असले तरी त्याच्यातील औषधी गुणांमुळे ते अत्यंत उपयुक्त ठरते.

आपली प्रतिक्रिया द्या