गणरायास 21 दुर्वा का वाहतात? जाणून घ्या काय आहे आख्यायिका

गणेश चतुर्थीत बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात. मायावी अनलासुर नावाच्या राक्षसाने ऋषी मुनी आणि देवता यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले. अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झाला पण गणेशाच्या पोटात आग होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्य़ा गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. कश्यप ऋषींनी दुर्वांची 21 जुडी गणेशाला खाण्यास दिली आणि गणेशाच्या पोटातील आग थांबली.

गुणकारी दुर्वा

– दुर्वांचा रस थंड प्रकृतीचा असतो. उष्णतेचा विकार यावर ते गुणकारी आहे.
– मासिक पाळीच्या समस्यांवर दुर्वांचा रस प्यावा.
– अर्ध शिशीसाठी नाकात दुर्वाचा रस घालतात.
– जखमेतून रक्तस्त्राव होत असून तो लवकर थांबण्यासाठी दुर्वांचा रस लावावा.
– सारखी उचकी लागत असल्यास दुर्वांच्या मुळांचा रस आणि मध एकत्र करून प्यावे.

आपली प्रतिक्रिया द्या