विसर्जन मिरवणुकीसाठी रेल्वे पूल धोकादायक

484

मुंबईतील अनेक पूल धोकादायक झाल्यामुळे या पुलांवरून विसर्जन मिरवणुका काढताना नाचू नका, नाहीतर कोसळाल… मोठी दुर्घटना घडेल, असा इशारा महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी आधीच दिला आहे. आता धोकादायक रेल्वे पुलांवरून जातानाही नाचगाणे नको. अनेक रेल्वे पूलही धोकादायक स्थितीत असून अतीभाराने तेदेखील कोसळू शकतात, असा इशारा महापालिका आणि पोलिसांनी दिला आहे.

हिमालय पूल दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने अनेक पुलांबाबत गणेश मंडळांना दक्षतेचा इशारा दिला आहे. गणपती आगमनाआधीच हा इशारा देण्यात आला होता. आता विसर्जन प्रसंगी रेल्वे पुलांबाबतही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या पुलांवरून गणपती बाप्पांचे आगमन झाले त्याच पुलांवरून विसर्जन मिरवणुका काढण्यावर सर्व मंडळांचा भर असेल. किंबहुना तशा सूचना गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने देण्यात आल्या आहेत, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर यांनी दिली.

29 पुलांपैकी 8 पूल पाडले

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक आढळलेल्या 29 पुलांपैकी 8 पूल पाडण्यात आले आहेत. तर काही पूल वाहतूक आणि रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. यात किरकोळ दुरुस्ती करण्यात आलेल्या पुलांचे काम करण्यात आले असून नव्या पुलांचे बांधकाम आणि मोठी दुरुस्ती सुचवलेल्या पुलांचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

इतर धोकादायक पूल

वाकोला पाईप लाईन सर्व्हिस रोड ब्रीज, जुहू तारा रोड ब्रीज, धोबी घाट मजास नाला ब्रीज, मेघवाडी नाला ब्रीज, शामनगर अंधेरी, वांद्रे-धारावी मिठी नदी ब्रीज, रतननगर-दौलतनगर ब्रीज कांदिवली, ओशिवरा नाला एसव्ही रोड गोरेगाव ब्रीज, पिरामल नाला ब्रीज लिंक रोड गोरेगाव, चंदावडकर नाला ब्रीज मालाड, गांधीनगर कुरार व्हिलेज मालाड ब्रीज, प्रेमसागर नाला एसव्ही रोड ब्रीज मालाड, फॅक्ट्री लेन बोरिवली ब्रीज, कन्नमवारनगर घाटकोपर, लक्ष्मीबाग नाला ब्रीज घाटकोपर, नीलकंठ नाला. घाटकोपर.

पश्चिम उपनगरातील धोकादायक पूल

हंस बुग्रा मार्ग, पाईपलाईन सर्व्हिस रोड ब्रीज, वलभाट नाला ब्रीज, विठ्ठल मंदिर इरानी वाडी रगडापाडा ब्रीज, एसव्ही रोड कृष्णकुंजजवळील ब्रीज, आकुर्ली रोड, हनुमाननगर ब्रीज, ओशिवरा नाला, एसव्ही रोड ब्रीज, पिरामल नाला, लिंक रोड, एसबीआय कॉलनी ब्रीज, रतन नगर ते दौलत नगर ब्रीज (पूर्व).

उपनगरातील धोकादायक पूल

पूर्व उपनगरात आढळलेल्या सात धोकादायक पुलांपैकी चार पूल तोडण्यात आले असून कुर्ला येथील हरी मस्जिद नाला, लक्ष्मी बाग कल्हर्ट नाला ब्रीज, घाटकोपर निकांथ ब्रीज

या पुलांवर अतिदक्षतेचा इशारा

चिंचपोकळी रेल ओव्हर पूल आणि करी रोड रेल ओव्हर पूल पार करताना विशेष सूचनांचे काळजीपूर्व पालन करावे. n गणेश विसर्जन सुरळीतरीत्या पार पडण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

पुलांवरून जाताना हे करा

  • पुलांवरून विसर्जनाच्या वेळी जाताना गटागटाने जा.
  • पुलावर एकाच वेळी 16 टनांहून अधिक भार येणार नाही याची काळजी घ्या.
  • पुलांवर ध्वनिक्षेपकाचा वापर करू नका तसेच नाचगाणी करू नका.
  • पुलांवर जास्त वेळ थांबू नका. पोलीस आणि महापालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा.

हे आहेत धोकादायक पूल

मध्य रेल्वे -घाटकोपर रेल ओव्हर पूल, करी रोड, आर्थर रोड, चिंचपोकळी, भायखळा रेल ओव्हर पूल

पश्चिम रेल्वे- मरीन लाईन, ग्रँट रोड, सँडहर्स्ट, ग्रँट रोड आणि चर्नी रोडच्या मधील फ्रेंच रेल ओव्हर पूल, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रलमधील फॉकलँड रेल ओव्हर पूल, मुंबई सेंट्रल स्टेशनजवळचा बेलासीस, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर पूल, प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर पूल, दादर टिळक, गोरेगाव, मालाडमधील वीर सावरकर रेल ओव्हर पूल, बोरिवलीतील सुधीर फडके, दहिसर, सांताक्रुझचा मिलन, विलेपार्ले आणि अंधेरीतील गोखले रेल ओव्हर पूल.

आपली प्रतिक्रिया द्या