बाप्पा स्वगृही! चौपाटय़ा, कृत्रिम विसर्जन स्थळे सज्ज

267

यंदा  बाप्पा पाऊस घेऊन आले. गणरायाच्या आगमनानंतर सलग चार दिवस मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पण या पावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. दहा दिवस त्याची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आता उद्या बाप्पा स्वगृही जाणार आहेत. त्यांना जड अंतःकरणाने निरोप देताना भक्तांचा जीव कासावीस होईल. परंतु विसर्जन मिरवणूक दणक्यात निघावी यासाठी गणेशभक्तांनीही जय्यत तयारी केली आहे. विशेष करून मुंबईतल्या धोकादायक पुलांवरून जाताना खास काळजी घेण्यात येणार आहे. बाप्पाचे जिथून आगमन झाले तिथूनच विसर्जन मिरवणूक काढण्याच्या सूचना गणेशोत्सव समन्वय समितीने दिल्या आहेत.

  • 69 नैसर्गिक स्थळे
  • 32 कृत्रिम तलाव
  • 8 हजार कर्मचारी तैनात
  • 69 प्रथमोपचार केंद्रे
  • 42 निरीक्षण मनोरे
  • 81 स्वागत कक्ष
  • 84 शौचालये
  • 65 सुसज्ज रुग्णवाहिका
  • 218 निर्माल्यांचे कलश

जिथून आगमन तिथूनच विसर्जन मिरवणुका 

ज्या पुलांवरून बाप्पांचे आगमन झाले तिथूनच विसर्जन मिरवणुका काढण्याच्या सूचना गणेशोत्सव समन्वय समितीने दिल्या आहेत. पुलांवर गर्दी करू नये. पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच मार्गक्रमण करावे. पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची विनंतीही समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहीबावकर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या