कर्जत नदीमधील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी

सामना ऑनलाईन । कर्जत 
स्वच्छता अभियानासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, अनेक सामाजिक संस्था, संघटना, मंडळे, धार्मिक संस्था, राजकीय पक्ष, शालेय विद्यार्थी, पुढाकार घेवुन गावागावात -तालुका पातळीवर स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना आजारापासून मुक्त करून व सम्रुध्दीच्या दिशेने वाटचाल करून परिसर स्वच्छ करत आहेत. अशीच स्वच्छता दहिवली भागातील नदीमधील कचरा रोज गोळा करण्याचे काम येथील स्थानिक नागरिक दिलीप शिंदे हे करत आहेत पण तो कचरा नगरपालिका उचलून नेण्याचे सौजन्य दाखवत नसल्याने तो कचरा तेथेच पडून अस्वच्छता  निर्माण झाली आहे.
उल्हास नदी खंडाळ्याच्या घाटातून उगम पावून कर्जत गावातून आणि शहरातून पुढे खाडीला जाऊन मिळते. गेले काही वर्षांपासून या नदीचे ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवून त्या भागातील पाण्याची पातळी वाढवणायचे प्रयेत्न सरकार कडून चालू आहेत. कर्जतमध्ये दहिवली आणि कर्जतला जोडणारा पायपूल  वजा बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर दहिवली भागातील नदीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी साचते. येथील स्थानिक नागरिक या पाण्याचा वापर पहिले करत होती
तरुण मुले पोहण्यासाठी या नदी मध्ये उतरत असत., बाग बगिच्यासाठी हे पाणी उपसा करून वापरले जात होते. परंतु गेले काही वर्षांपासून ह्या नदीला कचऱ्याचे  आणि अस्वछतेचे ग्रहण लागले आहे. शिरसे, अकुर्ले शनिमंदिर , मारवाडी पेठ, दहिवली ह्या प्रवासात येथील नागरिक  ह्या नदीत कचरा टाकत असल्याने नदीचे पाणी खूप खराब झाले आहे.मारवाडी पेठेतील काही सौचालायची आउटलेट या नदीत सोडले आहेत. प्लॅस्टिकच्या कचऱ्याने नदीला विळखा घातला आहे.

अनेक वेळा नगरपालिकेच्या माध्यमातून येथील छत्रपती शिवाजी मंडळ, गणेश मित्र मंडळ, भोई समाज मित्रमंडळ, दिलीप शिंदे मित्रमंडळ या सारख्या मंडळांनी नदी स्वच्छता अभियान बऱ्याच  वेळा राबवून या नदीमधील कचरा साफ केला आहे. एक महिन्यापूर्वी गरपालिकेच्या माध्यमातून नदीस्वच्छता अभियान  राबिवले आणि नदीमधील कचरा किनाऱ्याला काढून ठेवलं होता. त्यानंतर गेले महिनाभर दिलीप शिंदे आणि त्यांचे मित्रमंडळ रोज सकाळी प्रवाह बरोबर आलेला कचरा आणि स्थानिक नागरिकांनी टाकलेला कचरा रोज किनाऱ्यावर काढत आहेत आणि वेळोवेळी हा कचरा उचलून नेण्यासाठी नगरपालिकेला सांगत आहेत.  परंतु नगरपालिकेचे आरोग्य खाते आणि प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहेत. या कचऱ्यामुळे आता येथे दुर्गंधी पसरू लागली आहे आणि त्याचा परिणाम येथील स्थानिक नागरिकांवर होत असल्याचा आरोप दिलीप शिंदे यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या