मुंबई सफारी :- गार्डन पार्क

569

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रचंड गजबजलेले आणि माणसांची भरपूर गर्दी असलेले शहर म्हणजे ‘मुंबई’. वाढत्या गर्दीला सामावून घेणाऱ्या मुंबापुरीत आजही अशी भरपूर ठिकाणं आहेत, जिथे वीकेण्डला मजामस्ती करता येईल. त्यासाठी स्पेशल गाडीच पाहिजे असं नाही. ती असेल तर उत्तम, नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट, टुरिस्ट बस आहेतच. इतकंच नव्हे, तर नुसत्या सायकलने आणि चक्क चालतही शहराचा फेरफटका मारता येतो. चला तर आपणही मुंबईतली अशीच काही निसर्ग सौंदर्याने नटलेली आणि शांत ठिकाणं जाणून घेऊया.

‘मुंबईतील निवडक गार्डन’

१)कमला नेहरु पार्क
मलबार हिल परिसरात असलेले हे गार्डन प्रचंड लोकप्रिय आहे. या गार्डनच्या आवारात म्हातारीचा बुट व नयनरम्य असे दृष्यही आपल्याला पाहता येईल.

kamla-nehru-park

२)हँगिंग गार्डन
कमला नेहरु पार्कच्या शेजारीच असलेले हँगिंग गार्डन कमला नेहरु पार्क इतकेच लोकप्रिय आहे. या गार्डनमध्ये झाडे आणि वेलींना विशिष्ट आकार देऊन प्राणी साकारण्यात आले आहेत.

hanging-garden

३)जॉगर्स पार्क
हे पार्क मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉक अर्थात चालण्याचा किंवा धावण्याचा व्यायाम करण्यासाठी लोकप्रिय आहे. वांद्रे पश्चिम येथे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले हे पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

joggerspark

४)जिजामाता उद्यान
राणीचा बाग म्हणून प्रसिध्द असलेले हे गार्डन भायखळा येथे आहे. हे गार्डन पेग्विंनसाठी प्रसिध्द आहे.

pegwin-jijamata

५)हॉर्निमन सर्कल गार्डन
१२,०८० यार्ड इतक्या परिसरात पसरलेले हे गार्डन दक्षिण मुंबईत वसलेले आहे. हे गार्डन सभारंभांसाठी प्रसिद्ध आहे.

horniman-circle-garden

मुंबई सफारी :- आर्ट गॅलरी

६)जोसेफ बॅटिस्टा गार्डन
जोसेफ गार्डन हे माझगांव गार्डन या नावाने प्रसिध्द आहे. हे गार्डन नैसर्गिक सौंदर्यांने परिपूर्ण आहे.

basitsa-garden

७)फाइव्ह गार्डन
ब्रिटीशांनी विकसित केलेले फाइव्ह गार्डन हे माटुंगा पूर्वेला आहे. इथे पाच गार्डन एकत्र विकसित करण्यात आली आहेत. जवळच पारशी लोकांचे आकर्षक बंगले आहेत.

five-gardens

८)महेश्वरी उद्यान
हे गार्डन माटुंगा पूर्व या परिसरात आहे. रोडच्या मध्यभागी असलेले हे गार्डन वृध्द माणसे व लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

maheshwari-udyan

९) रॉक गार्डन
नवी मुंबईतील नेरुळ पूर्वेला वसलेले रॉक गार्डन हे पिकनिकसाठी प्रसिध्द आहे. शांतताप्रिय असलेले हे गार्डन लहान मुलांसाठी तसेच कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे.

rock-garden

१०) ड्रीम पार्क
नावात ‘ड्रीम’ असलेले हे पार्क हुबेहूब स्वप्ननगरी सारखेच आहे. कांदिवली पूर्वेला असलेले हे गार्डन लहान मुले तसेच कॉलेज युवकांसाठी एक वेगळेच आकर्षण आहे.

dream-park

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील आपल्या पसंतीच्या उद्यानांची माहिती आम्हाला नक्की कळवा. खाली दिलेल्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये टाइप करुन ही माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या