आता फक्त 30 मिनिटात गॅस सिलिंडर तुमच्या दारात! फेब्रुवारीपासून अंमलबजावणी!!

प्रातिनिधीक फोटो

गॅस सिलिंडर बुक केल्यावर दोन-तीन दिवस वाट बघावी लागते. काही वेळा तर बुकिंग केल्यानंतर आठवडाभर सिलिंडर येत नाही. ज्यांच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहे त्यांचे तर जास्तच हाल होतात. शिवाय यामुळे चीडचीड आणि मनस्तापही सहन करावा लागतो, मात्र आता ही वेळ ग्राहकांवर येणार नाही. कारण बुकिंग केल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या 30 मिनिटांच्या आत गॅस सिलेंडर तुमच्या दारात पोहोचणार आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने ग्राहकांना सिलेंडर वेळेत न मिळणं या समस्येवर एक प्रभावी प्लान तयार केला आहे. सध्या राज्यातील फक्त एकाच शहरात या प्रक्रियेला सुरुवात होणार असून नंतर या योजनेचा विस्तार होणार आहे.

फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

या योजनेवर काम सुरू असून फेब्रुवारीच्या एक तारखेपासूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असा दावा इंडियन ऑईलने केला आहे. आयओसीचे जगभरात 28 कोटी ग्राहक आहेत. यामध्ये 14 कोटी ग्राहक इंडियन ऑइल कंपनीचे सिलेंडर वापरतात. सिलेंडर संपल्यानंतर ग्राहकांनी बुक केल्यानंतर तो मिळेपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पुन्हा पुन्हा पाठपुरावा करावा लागतो. बरेच दिवस वाट पाहावी लागते, या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आयओसीने या योजनेची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या