नाशिकमध्ये भीषण अपघात दोन ठार; एक गंभीर जखमी

26

सामना प्रतिनिधी, नाशिक

आडगाव शिवारात आज सकाळी गॅस टँकर व तवेरा कारच्या भीषण अपघातात महिलेसह चालकाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे.

मालेगावचे देवकिसन गगराणी हे पत्नी पुष्पा यांच्यासोबत अमेरिकेत स्थायीक असलेल्या मुलाला मुंबई विमानतळावर पोहोचविण्यासाठी गेले होते. तेथून तवेरा कारने परतताना सकाळी सात वाजता नाशिकच्या के.के.वाघ महाविद्यालयासमोर गतिरोधकाजवळ चालकाला वेग नियंत्रणात आणता आला नाही, ही कार पुढील गॅस टँकरवर आदळली, यात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. गंभीर जखमी चालक गोरख लक्ष्मण पवार (३९) व पुष्पा गगराणी (५२) यांचा शासकीय रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. देवकिसन गगराणी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या