अदानींची आता टाटा- बिर्लांशी टक्कर; ‘या’ क्षेत्रात करणार एन्ट्री!

जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले उद्योगपती गौतम अदानी सतत आपला करभाराचा व्याप वाढवत आहेत. नुकतेच त्यांनी सिमेंट उद्योगात पदार्पण केले आहे. आता ते मेटल सेक्टरमध्ये प्रवेश करणार आहेत. अदानी इंटरप्रायजेस ही त्यांची कंपनी ओदिशामध्ये अॅल्यूमिना रिफायनरी प्लांट लावण्याची तयार करत आहेत.

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह आता नवनवीन क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारने अदानी समुहाला प्लांट लावण्याची परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप, याबाबत अदानी समुहाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अदानी समुहाला रायगड जिल्ह्यात रिफायनरी प्लांट लावण्याची परवानगी दिली आहे. तसेच या प्लांटसाठी अदानी समूह 5.2 अब्ज डॉलरची ( सुमारे 41 हजार कोटी) गुतंवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या अॅल्यूमिना रिफायनरीची एकूण क्षमता 40 लाख टन असेल. गौतम अदानी यांनी डिसेंबर 2021 मुंद्रा अॅल्युमिनियम लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यांच्या क्षेत्रातील प्रवेशामुळे या क्षेत्रात आधीपासूनच असलेल्या टाटा, बिर्ला आणि वेंदाता रिसोर्सेस लिमिटेड यांच्याशी अदानी यांची टक्कर होणार आहे.