गौतम अदानी, शिव नाडर, अशोक सुटा दानशूर हिंदुस्थानी

उद्योगपती गौतम अदानी, शिव नाडर, अशोक सुटा यांनी केलेल्या अब्जावधी रुपयांच्या दानामुळे ते दानशूर व्यक्ती ठरले आहेत. पर्ह्ब्सने आज दानशूर व्यक्तींची यादी जारी केली. मात्र या यादीत कोणालाही क्रमांक देण्यात आलेला नाही.

आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासाबरोबर अदानी फाउंडेशनच्या मदतीने सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या गौतम अदानी यांनी जून 2022मध्ये साठाव्या वर्षात पदार्पण केले. या वेळी त्यांनी 60 हजार कोटी दान करण्याचा विचार बोलून दाखवला. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. उद्योगपती शिव नाडर यांनीही शिव नाडर फाउंडेशनच्या माध्यमातून मनुष्याला मुळापासून बदलवून टाकणाऱया शिक्षणासाठी 11,600 कोटी रुपयांचे दान जाहीर केले आहे. उद्योगपती अशोक सुटा यांनीही एसकेएएन ही मेडिकल रिसर्च ट्रस्ट स्थापन करून 600 कोटीचे दान जाहीर केले आहे.