मानलं तुला! राम मंदिरासाठी टीम इंडियाच्या माजी खेळाडूने दिले 1 कोटी

अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी निधी संकलनाची सुरुवात झाली आहे. सामान्यातील सामान्य व्यक्ती ते बडे बडे उद्योजक, सेलेब्रिटी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी शेकडो, हजारो, लाखो, कोटींमध्ये दान देत आहेत. यात एक नाव टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याचेही असून त्याने राम मंदिराच्या निर्माणकार्यासाठी 1 कोटी रुपये दिले आहेत.

दिल्लीतून भाजपच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून आलेल्या गौतम गंभीर याने प्रभू श्रीराम जन्मभूमि तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या संतांची भेट घेऊन आपल्या व कुटुंबियांच्या वतीने 1 कोटी रुपयांचे दान दिले.

राम मंदिर निर्माणकार्यासाठी खारीचा वाटा उचलल्यानंतर गंभीर म्हणाला की, ‘अखेर एक जुना मुद्दा संपला आहे. यामुळे एकता आणि शांततेचा मार्ग आणखी प्रशस्त होईल. मी आणि माझ्या कुटुंबाने यासाठी छोटेसे योगदान दिले आहे.’

gambhir

दरम्यान, याआधी राम मंदिर निर्माणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तसेच शिवसेनेने मोठा निधी दिला आहे. राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होण्यासाठी 36 ते 40 महिने लागतील असे प्रभू श्रीराम जन्मभूमि तिर्थक्षेत्र ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या