गौतम गंभीर निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून पूर्व दिल्लीतून तिकीट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

क्रिकेटमधील आपली कारकीर्द गाजवून गौतम गंभीर आता राजकीय मैदानात उतरला आहे. भारतीय जनता पक्षाने गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.

दिल्लीत आपने आणि काँग्रेसने सहा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने रविवारी 5उमेदवारांची घोषणा केली होती. आता नव्या यादीत दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात मीनाक्षी लेखी आणि गौतम गंभीर यांचे नाव आहे. मीनाक्षी लेखी यांना नवी दिल्लीतून तर गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसची दिल्लीतील यादी जाहीर, 2014 ला झाला होता सुपडा साफ

गौतम गंभीर यांचा समना काँग्रेसच्या अरविंदर सिंह लवली आपच्या अतिशी मर्लेना यांच्याशी होणार असून मीनाक्षी लेखी यांचा सामना अजय माकन व आपचे ब्रिजेश गोयल यांच्याशी होणार आहे.