शाहिद आफ्रिदी जोकर, गौतम गंभीर व हरभजन सिंगने फटकारले

पाकव्याप्त कश्मीरमध्ये जाऊन हिंदुस्थान व पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला टीम इंडियाचे माजी खेळाडू गौतम गंभीर व हरभजन सिंग यांना चांगलेच फटकारले आहे. शाहिद आफ्रिदी हा जोकर आहे अशा शब्दात गौतम गंभीरने त्याची खिल्ली उडवली आहे.

शाहिद आफ्रिदी हा कायम हिंदुस्थानविरोधी वक्तव्य करत असतो. नुकतंच त्याने पाक व्याप्त कश्मीरमध्ये जाऊन हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विषारी फूत्कार काढले आहेत. यावरून त्याच्यावर हिंदुस्थानातून मोठ्या प्रमाणात टीका होत असताना भाजप खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने खडे बोल सुनावले आहेत.

‘आफ्रिदी, इम्रान, बाजवा यांच्यासारखे जोकर्सफक्त हिंदुस्थान व पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गरळ ओकून पाकिस्तानच्या जनतेला मूर्ख बनवू शकतात. पण त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत कश्मीर मिळणार नाही. बांगलादेश लक्षात आहे का?’ असे विचारत गौतम गंभीरने शाहिद आफ्रिदीची खिल्ली उडवली आहे.

काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करा असे सांगणारा हरभजन सिंग हा देखील त्यांच्यावर संतापला आहे. ‘शाहिद आफ्रिदीने त्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आङेत. माझ्या देशाबद्दल व पंतप्रधानांबाबत त्याने केलेले वक्तव्य हे बिलकूल मान्य नाही. त्याने त्याच्या हद्दीत राहावं. त्याला आमच्या देशाबद्दल असं बोलण्याचा हक्क नाही’, असे हरभजन सिंग याने त्याला सुनावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या