शाहीद आफ्रिदीला दहशतवाद्यांचा पुळका, गौतम गंभीरचे चोख प्रत्युत्तर

20

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी सुरक्षा दलाच्या कारवाईत तब्बल १३ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याबद्दल पाकिस्तान सरकारला दुःख झालेले असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला या मेलेल्या दहशतवाद्यांचा पुळका आला आहे. या मृत दहशतवाद्यांबद्दल त्याने सहानुभूती व्यक्त केली आहे. कश्मीरची परिस्थिती ही अस्वस्थ, चिंता करणारी असल्याचे म्हटले आहे. यावर हिंदुस्थानच्या गौतम गंभीर म्हणाला, शाहीद आफ्रिदीने ‘यूएन’वर नजरा लावल्या आहेत. मात्र त्याच्या डिक्शनरीत ‘यूएन’चा अर्थ अंडर १९ असा आहे आणि हे त्याचे वयही आहे. मीडियाने त्याच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. नो बॉलवर विकेट घेण्याचा आनंद घेण्याची पाकिस्तानी खेळाडूंची सवयच आहे

आपली प्रतिक्रिया द्या