आयपीएलमधील नाचक्की : गौतमचा ‘गंभीर’ गौप्यस्फोट!

54

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएलच्या ११ सत्रामध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा माजी कर्णधार गौतमने गंभीरने मोठा खुलासा केला आहे. दिल्लीच्या संघातून बाहेर बसण्याचा निर्णय माझा स्वत:चा नव्हता, तर संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता, असा गौप्यास्फोट गंभीरने केला आहे. ‘एबीपी न्यूज’शी बोलताना त्याने हा गौप्यस्फोट केला आहे.

‘हे’ तीन दिग्गज खेळाडू आयपीएलनंतर करु शकतात क्रिकेटला अलविदा

‘मी संघातून स्वत:हून बाहेर गेलो नव्हतो तर मला संघ व्यवस्थापनने बाहेर बसवलं होतं. कदाचित संघ व्यवस्थापनाने आखलेल्या प्लॅननुसार माझे संघात स्थान नसावे. या निर्णयामुळे मला त्रास झाला नाही. मी स्वत: संघाबाहेर बसल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, परंतु सत्य हे आहे की मी प्रत्येक सामना खेळण्यासाठी तयार होतो’, असे गंभीर म्हणाला.

गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने ६ सामने खेळले होते आणि या पैकी फक्त एका सामन्यात त्यांना विजय मिळाला होता. दिल्लीच्या खराब प्रदर्शनामुळे गंभीरने सुरुवातीच्या सामन्यानंतर कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला एकदाही मैदानात उतरण्याची संधी देण्यात आली नाही.

गंभीरने यंदाच्या सत्रात ६ सामन्यात फक्त ८५ धावा केल्या आहेत. यात त्याचा सर्वोत्तम स्कोर ५५ होता.

आपली प्रतिक्रिया द्या