नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती इन्स्टाग्रामवर कायम वेगवेगळे फोटो शेअर करत असते. नुकतेच आता तिने इन्स्टाग्रामवर मोरपंखी पैठणी साडीत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती नाकात नथनी, कपाळावर टिकली, हातात बांगड्या आणि केसात गजरा अशा पारंपारिक लूकमध्ये गौतमी अत्यंत सुंदर दिसत आहे.