समलिंगी जोडप्यासाठी केळवण, मित्र परिवाराच्या उपस्थितीत धूमधडाक्यात पार पडला लग्न सोहळा

मराठी जनांमध्ये लग्न होणापूर्वी केळवणाची पद्धत आहे. सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात एका समलिंगी जोडप्यासाठीही केळवण करण्यात आले आहे.

ब्रायन आणि श्रीराम या जोडप्याचं नुकतंच लग्न पार पडलं.

या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि दोघांनी ठेवलेल्या रिसेप्शनला 100 हून अधिक जण उपस्थित होते.

या लग्न सोहळ्याबद्दल आणि केळवणाबद्दल मूळच्या मुंबईच्या असलेल्या आणि सध्या ऑस्ट्रेलियात असलेल्या कांचन मांजरेकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

कांचन यांनी त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या मदतीने या जोडप्यासाठी केळवण ठेवलं होतं.

या केळवणामुळे ब्रायन आणि श्रीराम यांना प्रचंड आनंद झाला होता असं कांचन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.