गयामध्ये भाजपच्या महिला मोर्चा, उपाध्यक्षांवर मुस्लिमांचा हल्ला

527

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याच्याविरोधात बिहारमधील गयामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चातील मुस्लीम निदर्शकांनी धुडघुस घातला. त्यावेळी भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षांवर हल्ला केला. सुदैवाने त्यांनी आणि त्यांच्या मुलाने पळ काढल्यामुळे त्या बचावल्या.

गया जिल्ह्य़ातील रामपूर परिसरात मिर्जा गालिब पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. तिथून जात असताना निदर्शने करणाऱयांनी उपाध्यक्ष शोभा सिन्हा यांची गाडी रोखली. त्यांच्या गाडीवरील भाजपचा झेंडा काढून घेतला आणि हल्ला केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. गाडीत असलेल्या शोभा सिन्हा आणि त्यांच्या मुलाने पळ काढला आणि जीव वाचवला. या प्रकरणी अज्ञात निदर्शकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या