‘हे’ अॅप तत्काळ अनइन्स्टॉल करा, अन्यथा तुमचे व्हॉट्सअॅप बंद होऊ शकते

97

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरामध्ये कोट्यवधी लोक व्हाट्सअॅप (WhatsApp) हे मेसेंजर अॅप वापरतात. परंतु व्हाट्सअॅप थर्ड पार्टी अॅप्लिकेशनने व्हाट्सअॅप वापरणाऱ्या युझर्सवर प्रतिबंध लगावण्याच्या तयारीमध्ये आहे. व्हाट्सअॅप प्लस (WhatsApp Plus) आणि जीबी व्हाट्सअॅप (GBWhatsApp) नावाचे अॅप युझर्सने अनइन्स्टॉल किंवा डिलीट करावे अन्यथा सेवा बंद करण्यात येईल अशी चेतावणी व्हाट्सअॅपने दिली आहे.

अनेक अॅप डेव्हलपर्सने व्हाट्सअॅपचे मोडिफाईट व्हर्जन बनवले आहे. व्हाट्सअॅपने चेतावणी दिल्यानंतरही युझर्स व्हाट्सअॅपचे क्लोन अॅप वापर करत आहे. त्यामुळे युझर्सच्या खासगी माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे युझर्सने असे अॅप अनइन्स्टॉल किंवा डिलीट करावे अशी चेतावणी व्हाट्सअॅपने दिली आहे.

व्हाट्सअॅपचे प्रवक्ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, व्हाट्सअॅप आपल्या युझर्सच्या सुरक्षितेतेबाबत प्रतिबद्ध आहे. युझर्सची खासगी माहिती सुरक्षित राहावी म्हणून आम्ही त्यांना क्लोन अॅप डिलीट करण्यास सांगितले आहे. तसेच युझर्सने अधिकृत अॅप स्टोअरमध्ये जाऊन व्हाट्सअॅपचे ओरिजनल व्हर्जन डाऊनलोड करावे असाही सल्ला देण्यात आला आहे. आम्ही याचा दुरुपयोग रोखण्यासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. जर तुम्ही व्हाट्सअॅपचे क्लोन व्हर्जन वापरत असाल तर तुमचे अकाऊंट बंद करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या