आमदाराच्या आवाजात बोगस क्लिप, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक

2490

मीरा भाईंदर मधील अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजात बोगस ऑडिओ क्लिप बनवून ती व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी रंजू झा यांनी हा प्रताप केला असून नवघर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या मीरा-भाईंदर उपाध्यक्ष असलेल्या रंजू झा यांचा हा कारनामा बघून हाच का ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. गीता जैन यांच्या नकली आवाजाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली असून या संदर्भात त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजू झा यांना अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला

क्लिपमध्ये काय आहे
या ऑडिओ क्लिप मध्ये एका महिलेच्या आवाजात असे म्हटले आहे की केंद्र सरकार प्रत्येक कोरोना रुग्णामागे नगरपालिका आणि महानगरपालिकेला दीड लाख रुपये देत आहे. खासगी डॉक्टर, खासगी प्रयोगशाळा, आरोग्य विभाग कोरोना रुग्ण वाढले पाहिजेत याच्यावर लक्ष देत असून सर्दी-ताप आला असेल तर त्यांना रुग्णालयात जबरदस्तीने दाखल केले जात आहे. दीड लाख रुपये त्यांना मिळाले की रुग्णाला घरी पाठवण्यात येते, त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या