रेल्वे ट्रॅकवर आढळल्या जिलेटीनच्या कांड्या, तपास सुरू

सानमा ऑनलाईन । नवी मुंबई

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे ट्रॅकवर लोखंडी तुकडे सापडण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच आज नवीमुंबईतील तळोजा-नावडा रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या सापडल्या आहेत. यासंदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी दिवा आणि कळंबोली येथे रेल्वे ट्रॅकवर मोठे लोखंडी तुकडे ठेवल्याचे आढळून आले. पण सुदैवाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे कोणताही अपघात झाला नाही. मात्र लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे रेल्वे सुरक्षेला धोका असल्याची एक शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे या घटनांचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. आज तळोजा आणि नावडा स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने परिसरात खळबळ माजली. रेल्वे रुळांवर जिलेटीनच्या कांड्या सापडणे म्हणजे घातपाताची शक्यता असल्याची भिती व्यक्त करण्यात होती. मात्र पोलिसांनी अज्ञाप यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या