मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. येच्युरी यांना रुग्णालयातील इमरजेन्सी विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.
दरम्यान, ते रुग्णालयात नियमित तपासणीसाठी आले होते, मात्र निमोनियामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. एम्सकडून मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.