गुजरातमधील काँग्रेसच्या एकमेव खासदार गेनीबेन ठाकोर सध्या चर्चेत आल्या आहेत. त्यांचा भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेनीबेन यांनी सोमवारी लोकसभेमध्ये गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा पदयात्रेचा उल्लेख करत ही मागणी केली. गायीच्या दूधापासून शेणापर्यंतचे महत्त्व सांगताना त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
देशातील साधू-संत, महंत आणि शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी पदयात्रा काढून गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी केली आहे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि गोहत्येवर बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे. गाईचे दूध खूप आरोग्यदायी आहे. नैसर्गिक शेतीमध्ये शेणाची गरज असते. जनावरांच्या खरेदी आणि विम्यावर जीएसटी लावण्यात आला आहे, तो हटवण्यात यावा, अशी मागणीही त्यांी केली आहे.
ज्योतिर्मठ यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून काँग्रेस खासदार गेनीबेन ठाकोर यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘परमाराध्य ज्योतिषपीठाधिश्वर जगद्गुरू शंकराचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आदरणीय गाय भक्त गेनीबेन ठाकोर यांनी आज लोकसभेत गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. शंकराचार्य यांच्या तीर्थयात्रेचाही उल्लेख केला, असे मठाच्या वतीने सांगण्यात आले.
परमाराध्य ज्योतिष्पीठाधीश्वर जगद्गुरु शङ्कराचार्य जी महाराज की प्रेरणा से गोभक्त आदरणीय गेनीबेन ठाकोर ने आज संसद् में गौमाता को राष्ट्रमाता घोषित करने की बात उठाई। शङ्कराचार्य जी की पद यात्रा का उल्लेख भी किया।#गौमाता_राष्ट्रमाता pic.twitter.com/0ZzoY7nZth
— 1008.Guru (@jyotirmathah) August 5, 2024
गेनीबेन ठाकोर या गुजरातमधील काँग्रेसच्या एकमेव लोकसभा खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बनासकांठा मतदारसंघातून भाजपचा पराभव करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. याआधीही ठाकोर त्यांच्या काही निर्णयांमुळे गुजरातमध्ये चर्चेत आल्या होत्या.