अमेरिकेच्या 140 शहरांमध्ये दंगलीचा वणवा भडकला, लष्कर पाचारण करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

1462

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड याची हत्याच झाल्याचा स्पष्ट निर्वाळा डॉक्टरांनी दिला आहे. एकापेक्षा जास्त जणांनी फ्लॉयडला मारहाण केली तसेच त्याचा गळा दाबला, असे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल येताच अमेरिकेत दंगलीचा वणवा भडकला असून 140 शहरे यात होरपळली आहेत.

ईट हाऊससमोरील आंदोलकांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी रबराच्या गोळ्या चालविल्या. दरम्यान, आंदोलन शांत झाले नाही तर लष्कराला पाचारण करण्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

protesters-crshed-under-boot-george-floyed

अमेरिकेच्या मिनिसोटे प्रांतात कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड याची पोलिसांनी हत्या केली. 26 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकेत हिंसाचाराचा भडका उडाला आहे. वॉशिंग्टन, डल्लास, ह्युस्टन, अटलांटा, वॅâलिफोर्निया आदी 140 शहरांमध्ये दंगलखोरांनी उत्पात माजवला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. बऱ्याच ठिकाणी जमावाच्या रोषाला पोलीस बळी पडले. यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले आहेत. सोमवारी व्हाईट हाऊससमोर आंदोलन करणारे आंदोलक अत्यंत आक्रमक झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

protesters-with-flag-george-floyed

काल लपले, आज समोर आले
आंदोलकांच्या भीतीपोटी बंकरमध्ये लपलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज मंगळवारी समोर आले. व्हाईट हाऊसच्या बाजूलाच असलेल्या सेंट जॉन चर्चच्या बाहेर त्यांनी बायबल हातात घेऊन फोटोही काढले. मी ‘लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर प्रेसिडेंट’ असल्याचे सांगून त्यांनी आंदोलन तात्काळ शमले नाही तर लष्कराला पाचारण करण्यात येईल, असा इशारा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांना चर्चमध्ये जाण्यासाठी पोलिसांना व्हाईट हाऊससमोरून आंदोलकांना हुसकवावे लागले. त्यासाठी रबराच्या गोळ्यांचा भडीमार करण्यात आला.

शवविच्छेदनात धक्कादायक खुलासा
जॉर्ज फ्लॉयडच्या शवविच्छेदनात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. केवळ एकाच अधिकाऱ्याने फ्लॉयडला मारले नाही तर यात एकापेक्षा जास्त अधिकारी सहभागी होते. फ्लॉयडच्या कुटुंबाने शवविच्छेदनासाठी स्वत:चा वैद्यकीय अधिकारी पाठविला होता. या अधिकाऱ्याने श्वास कोंडल्यामुळे फ्लॉयडचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या